दुकानातच सलून चालकाची गळफास घेऊन आत्महत्या
पळसगाव (पि.) नेरी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील सलून चालकाने मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या केली. अनिल शालिकराम बारसागडे (४०) असे मृताचे नाव आहे... नेरी येथे अनिल बारसागडे यांचे माही हेअर सलून आहे. बारसागडे हे दररोजप्रमाणे आपल्या दुकानात गेले होते. ते दुपारी दररोज घरी जायचे. मात्र, आज घरी आले नसल्याने मुलाने दुकानाकडे जाऊन बघितले असता दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळले. पीएसआय सोनुने, बुट्टे, गोणाडे यांनी पंचनामा केला. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. त्याच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे.