पुरोगामी महाराष्ट्रात मानवतेला काळीमा फासणार्या घटनेत व अनुसूचित जातीवरील अन्याय अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. याचीच प्रचिती म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली, हा राग मनात धरून बोढार हवेली (जि. नांदेड ) येथील अक्षय भालेराव या भीमसैनिकाची मराठा समाजाच्या नीच गावगुंडांनी निर्घृण हत्या केली गेली.
राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना न्याय,समता,बंधुता, विश्वास,अभिव्यक्ती असा जगण्याचा मार्ग दाखवला आणि त्याच बाबासाहेबांची जयंती निमित्त मिरवणूक का ? काढली म्हणून बोंढार हवेली गावात गुरुवारी लग्नाच्या वरातीत हातात तलवारी व लाठ्या-काठ्या घेऊन नाचत होते.आकाश राहुल भालेराव व अक्षय श्रावण भालेराव हे दोघे भाऊ दुकानावर वस्तू खरेदी करत असताना सायंकाळी साडेसातच्या सुमारास संजय तिडके याने गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणूक का ? काढली असे म्हणत तुम्हाला जीव मारुन टाकतो अशी धमकी देत त्याच्यासह सात ते आठ जणांनी भालेराव बंधूंना मारहाण सुरू केली .अक्षय भालेराव यांचे हातपाय धरून पोटावर खंजीरणे वार करून त्याला जागीस ठार केले. अक्षय चे आई भाऊ व अन्य नातेवाईकांना हल्ला करून गंभीर जखमी केले.
अक्षय भालेराव या तरुणाचा जातीयवादी सनातनी विचाराच्या गुंडांनी केलेल्या खून महाराष्ट्राच्या पुरोगामी मुखवट्यावर काळीमा फासणारा आहे.
या प्रकरणी मोव्हमेंट फॉर जस्टीस, गडचिरोली च्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौकात विविध पक्ष व संघट्नांच्या उपस्थितीत तीव्र निदर्शने करण्यात आले. व खालील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या.
1. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी व आरोपींना फाशीसारखी कठोर शिक्षा करावी.
2. या प्रकरण जलदगती न्यायालयात खटला दाखल करावा.
3. कुटूंबाच्या एका व्यक्तीस शासकीय नौकरीत समाविष्ट करावे.
4. पीडित कुटुंबाला 50 लाख रुपये तत्काळ आर्थिक मदत द्यावी.
5. पीडित कुटुंब व घटनेचे साक्षीदार यांना पोलीस संरक्षण द्यावे.
6. दोषींवर ॲट्रॉसिटी, हत्येचा कट या सकट इतर कलमनुसार कठोर कारवाई करावी.
7. आरोपींची सर्व प्रकारची मालमत्ता जप्त करावी.
आरोपींना पाठीशी घालणार्यांना सहआरोपी करावे.
8. गावातील अल्पसंख्यांक बौद्ध समाजाला आत्मसंरक्षणाकरिता शस्त्र परवाने द्यावेत.
उपरोक्त मागण्याची तातडीने दाखल घ्यावी आणि महाराष्ट्रातील राज्य हे संविधानाच्या चौकटीत चालते हे सिद्ध करण्याची आपल्या सरकारला मिळालेली संधी कामी लावावी अन्यथा आम्हाला या प्रकरणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
या आंदोलनात विशेष अतिथी म्हणून आभारिप चे राष्ट्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, शेतकरी कामगार पक्षाचे राज्य सचिव रामदास जराते, हेमंत डोर्लीकर, मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे अमोल मारकवार, राष्ट्रवादी काँग्रेस चे संजय कोचे, बुद्धिस्ट सोसायटी च्या प्रवृत्ती वाळके, धम्मराव तानादू, BRSP चे प्रितेश अंबादे, प्रतीक डांगे, भाकपाचे देवराव चवरे, SEM चे देवेंद्र सोनपिपरे उपस्थित होते त्याचप्रमाणे मूव्हमेन्ट फॉर जस्टीस च्या ऍड. भावना लाकडे, धर्मानंद मेश्राम, राज बन्सोड, डॉ. दिलीप बारसागडे, डॉ. संतोष सुरडकर, सुधीर वालदे, सोनल दमके,हितेंद्र गेडाम, के. डी. भालेराव, नागसेन खोब्रागडे, प्रफुल बांबोळे, प्रमोद गेडाम, शेकापचे अक्षय कोसणकर, अनिल मेश्राम, मोहन मोटघरे, तुषार भडके, दुष्यन्त तुरे, प्रमोद गेडाम, सुरज हमारे, मोरेश्वर रामटेके, शोभा खोब्रागडे, घनश्याम खोब्रागडे, चुडामन उंदीरवाडे, विलास दरडे, डी. के. डोहणे, राहुल वनकर, शेषराव तुरे, एम. पी. खोब्रागडे, खिरेंद्र म्हशाखेत्री, एस. जी. बारसागडे असे बहुसंख्येने कार्यकर्ता उपस्थित होते.
दि. 9 जून 2023
गडचिरोली
_________________
राज बन्सोड
समन्वयक, मुव्हमेंट फॉर जस्टीस,
गडचिरोली
8806757873