बेपत्ता विवाहित महिलेचा पाच महिन्यांपासून लागेना शोध





एटापल्ली: स्वयंपाक करून चुलीवर ठेवून एक महिला बेपत्ता झाल्याची घटना परसलगोंदी (ता. एटापल्ली) येथे ४ फेब्रुवारीला घडली होती. दरम्यान पाच महिन्यांनंतरही तिचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

रामे सुधाकर जोई (२८) असे त्या महिलेचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. रामे ही घरकाम करायची तर पती सुधाकर हा सूरजागड पहाडीवर कामाला जायचा. ४ फेब्रुवारी रोजी नित्याप्रमाणे रामे हिने स्वयंपाक करून चुलीवर ठेवला. सायंकाळी सात वाजता पती घरी आला तेव्हा ती गायब होती. शेजारी व नातेवाइकांकडे शोध घेऊनही ती सापडली नाही. त्यामुळे २२ फेब्रुवारीला आलदंडी पोलिस मदत

केंद्रात तक्रार दिली. त्यावरून बेपत्ताची नोंद झाली. मात्र, पाच महिन्यांनंतरही तिचा शोध लागलेला नाही. रामे जोई हिचे नेमके काय झाले, ती कुठे आहे, सुरक्षित आहे का, असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहे, त्यामुळे तिचा तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

जर्नल प्रसिद्ध केले

या महिलेबद्दल माहिती असल्यास आलदंडी पोलिस मदत केंद्राशी संपर्क करा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी पोलिसांनी शोधपत्रिका जाहीर केले असून ती पेठा, पेरमिली, तळोधी या परिसरात असल्याची शक्यता आहे