लेकीसमोर हात जोडून रडला बाप, तरी प्रियकरासोबत गेली निघून


नवी दिल्ली, : प्रत्येक आई-वडिल आपल्या मुलांवर खूप प्रेम करतात. त्यांनी शिक्षण घेऊन मोठं व्हावं, चांगलं करिअर करावं आणि व्यवस्थिरित्या सेटल व्हावं अशी प्रत्येकच पालकांची इच्छा असते. यासाठी ते खूप मेहनतही घेतात. मात्र कधी कधी मुलं आपल्या आई-वडिलांचं न ऐकता त्यांच्या मनाचं करत त्यांचा अपमानही करतात. अशा घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. नुकतीच अशीच एक घटना समोर आलीये ज्यामध्ये तरुणीने प्रेमासाठी आपल्या आई-वडिलांनाही सोडलं. भावुक करणारा व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.


प्रकरण बनासकांठा जिल्ह्यातील रैया गावातील आहे. तरुणीने काही काळापूर्वी घरातून पळून जाऊन प्रियकरासोबत लग्न केले होते. तेव्हापासून युवती तिच्या प्रियकरासोबत राहत होती. याबाबत वडिलांनी पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रारही दाखल केली होती. तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला आणि ती सापडली. पोलिसांनी फरार मुलगी आणि तिच्या प्रियकराला पालकांसमोर हजर केले असता, मुलीने त्यांना ओळखण्यास नकार दिला आणि पतीसोबत परत जाऊ लागली. आपल्या मुलीला जाताना पाहून वडिलांचे डोळे भरून आले.


वडिलांनी तिला जाण्यापासून रोखण्याचा सर्व प्रकारे प्रयत्न केला. मुलीसमोर डोकं टेकवलं, हात जोडले, नाकाही घासले, पण तरीही मुलीच्या मनाला घाम फुटला नाही आणि ती तिच्या प्रियकरासह गेली. हे सर्व पाहून वडील ढसाढसा रडू लागले. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा आणि डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही.

दरम्यान, अशी प्रकरणे यापूर्वीही समोर आले आहेत. प्रेमप्रकरणामुळे अनेक तरुणी तरुणांनी आपल्या आई-वडिलांना सोडलं आहे.
एका तरुणीने प्रियकरासाठी आई-वडिलांचं एवढ्या वर्षांचं प्रेम विसरलं. वडिलांनी आईने एवढी विनवणी करुनही तिनं त्यांचं ऐकलं नाही. या भावुक क्षणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय