गोंडपिपरी तालुक्यात एकूण 7 गावात 'असर सर्वेक्षण ' सुरू*


निखिल भडके करीत आहेत सर्वे

गोंडपिपरी :- तालुक्यातील भं. तळोधी, येनबोधला, चेकबेर्डी, पारडी, शिवणी देशपांडे, कनाडगाव, आणि तारसा (बूज) येथील प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी मातृभाषेची ओडक आहे की नाही. आणि मराठी वाचता येणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात सर्वे सुरू आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हे सर्वे सुरू आहेत. जिल्ह्यातील सर्वे करण्याच काम स्व. सुशिलाबाई रामचंद्रराव मामिडवार समाजकार्य महाविद्यालय पडोली चंद्रपूर या महाविद्यालयास मिळली आणि महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी जिल्हाभरात सर्वे करण्यासाठी गेले आहेत.
सर्वे करण्याची जबाबदारी आणि संपूर्ण प्रशिक्षण आणि जील्हा समन्वयक म्हनुण डॉ. सुभाष गिरडे सर आणि भालचंद्र सहारे यांच्याकडे आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील सर्वे पुर्ण करण्याची जबाबदारी निखिल भडके याच्याकडे आहे. सर्वे मधून महाराष्ट्रात एकूण किती विद्यार्थ्यांना मराठी वाचता येते याचे मूल्यांकन करण्याची जबाबदारी असर फाउंडेशन मुंबई घेत आहे.