मामाच्या घरी आलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळऊन नेले


सिरोंचा :- तालुक्यातील टेकडा येथे कार्यक्रमासाठी आपल्या कुटुंबासह मामाच्या घरी आलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळून नेल्याची घटना घडली. घटनेची तक्रार मुलीच्या वडिलांनी बामणी पोलिस ठाण्यात केली. असुन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

अश्विनी चिन्नामधुकर कोतुरी वय 17 वर्ष रा. कलमलपेठा ता. वेमनपल्ली, जिल्हा मंचेरियाल (तेलंगणा) असे अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे, तर एलीया मोहन कोतुरी वय 21 वर्ष . कलमलपेठा ता. वेमन पल्ली, जिल्हा मंचेरियाल असे फुस लावून पळवून नेलेल्या आरोपीचे नाव आहे.

तेलंगणातील चिन्नामधुकर कोत्तुरी हे आपल्या कुटुंबीयांसह टेकडा येथे आपल्या साल्याच्या मुलीच्या कानटोचणी साठी 24 मे ला आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांचे कुटुंबीय साल्याच्या घरी झोपले असता 25 मे च्या पहाटे 21 आरोपी एलिया मोहन कोतुरी याने अल्पवयीन मुलगी अश्विनी ला फुस लावून पळवून नेले. या घटनेची तक्रार मुलीच्या कुटुंबियांनी बामणी पोलिस ठाण्यात केली. आरोपीवर बामणी पोलिस ठाण्यात भांदवी कलम 363 अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल केला असुन अल्पवयीन मुलगी अश्विनी चिन्नामधुकर कोरी वय 17 वर्ष उंची 5 फूट रंग गोरा शरीर बांधा सडपातळ, केस काळे नाक लांब सरळ डोळे काळे पांढरे आकाशी रंगाचा सलवार घातला असुन अपहरण झालेली मुलगी व आरोपी हे कुणाला आढळून आल्यास बामणी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक मदन एम म्हस्के 9421923244, पोलिस उपनिरीक्षक दीपक पारधे 9657708138 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले असुन घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक पारधे हे करीत आहे.