२ मे ला गडचिरोली येथे होणाऱ्या पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचा सुशिक्षित बेरोजगारांनी लाभ घ्यावा



*खासदार अशोक भाऊ नेते यांचे जिल्हावासिय सुशिक्षित बेरोजगारांना जाहीर आवाहन*

*दिनांक 30 एप्रिल २०२३ गडचिरोली*

*सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे सरकार असलेल्या भाजपा शिवसेना सरकाच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी , सर्वसामान्यांन गोरगरीब सुशिक्षित बेरोजगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून आपल्या गडचिरोली जिल्ह्यात दिनांक २ मे २०२३ ला कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात या रोजगार मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून या रोजगार मेळाव्यात जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगारांनी मोठया हजारोच्या संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक भाऊ नेते यांनी केले आहे.*
*या रोजगार मेळाव्यात गडचिरोली जिल्ह्यातील सर्व महामंडळ , महाराष्ट्र उद्योजकता विकास महामंडळ खादी ग्रामोद्योग ,ओबीसी महामंडळ ,महीला आर्थिक विकास महामंडळ, एमएसएम्ई ,जिल्हा उद्योग केंद्र, उमेद, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय ,आर ,से, टी जिल्हा अग्रणी बँक ,कृषी ,आयटीआय , नाबार्ड अशा विविध विभागांचा यात प्रामुख्याने सहभाग राहणार असून रोजगार स्वयंरोजगाराचे मार्गदर्शन व मोठ्या प्रमाणावर रोजगारची उपलब्धता या भव्य रोजगार स्वयंरोजगार मेळाव्यातून होणार आहे. त्यामुळे या मेळाव्याचा जिल्ह्यातील तमाम सुशिक्षित बेरोजगारांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक भाऊ नेते यांनी केले प्रसिद्धी पत्रकाद्वारे आहे.*

#रोजगारमेळावा #Gadchiroli #GadchiroliChimurLoksabha #AshokNete