एकाच मुलीवर दोघांचे प्रेमसंबध... अन् झाला जिवे मारण्याचा प्रयत्न


मूल (प्रतिनिधी) : पोंभुर्णा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या देवाळा बुज ग्राम पंचायतचे शिपाई सुभाष मारशेट्टीवार आणि संगणक चालक अंकुश घोटेकार या दोघांचेही एकाच मुलीवर प्रेमसंबध होते. सुभाषने याबाबत अंकुशच्या घरी माहिती दिल्याने झालेल्या वादातुन शिपाई सुभाष मारशेट्टीवार याला जिवे मारण्याचा प्रयत्न देवाळा बुज ग्राम पंचायत येथे सोमवारी दुपारच्या सुमारास घडला. Chaparashi Subhash Marshettywar and computer operator Ankush Ghotekar of Devala Bhuj Gram Panchayat फिर्यादीच्या तक्रारीवरून संगणक चालक अंकुश घोटेकर वय 25 वर्षे रा. देवाळा बुज यांच्यावर कलम 307 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. Attempt to kill gram panchayat peon

मूल पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या व पोंभुर्णा तालुक्यातील देवाळा बुज येथील सुभाष बालाजी मारशेट्टीवार वय 31 वर्षे आणि अंकुश देवाजी घोटेकर वय 25 वर्षे यादोघांचेही एकाच मुलीवर प्रेमसंबध होते, सुभाषने अंकुशच्या घरी सदर प्रेमप्रकरणाबद्दलची माहिती सांगितल्याने अंकुशच्या मनात सुभाष बद्दल व्देष निर्माण झाला होता, सोमवारी दुपारच्या सुमारास सुभाष मारशेट्टीवार हे ग्राम पंचातय कार्यालयात खुर्चीवर बसुन असतानाच संगणक चालक असलेल्या अंकुश घोटेकर यांने सुभाषच्या गळात दोर आवळुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला,यामुळे सुभाषला दुखापत झाली आहे, सदर घटनेची फिर्याद सुभाष मारशेट्टीवार यांने मूल पोलीस स्टेशनला दिली. तक्रारीवरून मूल पोलीस स्टेशन येथे कलम 307 भांदवी अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास उपविभागीय अधिकारी मलिका अर्जुन इंगळे, पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विजय पंचबुध्दे, पोलीस शिपाई राकेश फुकट हे करीत आहे.