मी माझ्या नवऱ्याला सोडून देते आणि तुझ्याशी लग्न करते असे म्हणत विवाहितेने तरुणाची आर्थिक आणि शारीरिक फसवणूक केली.


एका विवाहित महिलेने एका अविवाहित युवकाला सांगीतले की, मी माझ्या नवऱ्याला सोडून देते आणि तुझ्याशी लग्न करते असे म्हणत विवाहितेने तरुणाची आर्थिक आणि शारीरिक फसवणूक केली. या प्रकरणी पीडित तरुणाने वाशिम शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, वाशीममधील हे तरुण-तरुणी असून त्यांचे दोघांचे तरुणीच्या लग्नाआधी एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. मात्र या दोघांच्या नात्याला घरच्यांचा विरोध असल्याने तिने दुसऱ्याशी लग्न केले. मात्र, लग्नानंतरही ती या तरुणाच्या संपर्कात राहिली. तरुणीच्या लग्नानंतरही त्यांच्यात संवाद सुरु होता. या दरम्यान विवाहितेने पीडित तरुणाला लग्नाचे आमिष दाखवून त्याच्याकडून पैसे उकळले.

मी माझ्या नवऱ्यापासून फारकत घेते आणि तुझ्याशी लग्न करते असे अश्वासन या विवाहितेने पीडित युवकाला दिले. तिच्यावर असलेल्या प्रेमावर विश्वास ठेवून त्याने अनेकदा तिला पेसे दिले. मात्र तिने त्याच्या शारीरिक आणि आर्थिक फसवणूक केली. याबाबत युवकाने वाशीम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

वाशीम पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, वाशीममधील या पीडित युवकाचं नात्यातील मुलीवर प्रेम होते. परंतु घरचा विरोध असल्याने तिने दुसऱ्या मुलासोबत लग्न केले. परंतु तिने लग्नानंतरही पीडित युवकास भुलथापा मारत मी फारकत घेऊन तुझ्याशी लग्न करते म्हणून वारंवार पैश्याची मागणी केली. पीडित तरुणाने अनेकदा तिला पैसेही दिले. मात्र पैश्याची मागणी वाढत गेली. विवाहितेने लग्नाचे आमिष दाखवून आपली शारीरिक व आर्थिक फसवणूक केली हे तरुणाच्या लक्षात आले. यानंतर त्याने वाशीम शहर | पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून न्यायाची मागणी केली आहे. आता पुढील तपास वाशिम पोलीस करत आहेत..