आरमोरीच्या शिक्षकाचा पवनीत अपघाती मृत्यूआरमोरी : येथील ताडूरवारनगरात वास्तव्यास असलेल्या एका शिक्षकाचा भंडारातील पवनी येथे अपघाती मृत्यू झाला. ८ मे रोजी पहाटे ही घटना घडली. सवयीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेले असता त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली.

शिक्षक सुरेश काशिनाथ सहारे (५६) असे मयत शिक्षकाचे नाव आहे. कुरखेडा तालुक्यातील खडकी जिल्हा परिषद शाळेत ते कार्यरत होते. नातेवाइकाची प्रकृती बरी नसल्याने ते बघण्यासाठी 

भंडारातील पवनी येथे गेले होते. सवयीप्रमाणे सोमवारी पहाटे पाच वाजता रस्त्याने मॉर्निंग वॉकसाठी गेले. यावेळी त्यांना अज्ञात वाहनाने चिरडले.

आरमोरी येथील गाढवी नदी तीरावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी दोन मुले आहेत.