गडचिरोली
आज दिनांक ८/०५/२०२३ला मा.आमदार कृष्णाभाऊ गजबे यांचे उपस्थितीत गडचिरोली जिह्यातील आदिवासी विविध कार्य. संस्था सभापती,उपसभाती,संचालक तथा व्यवस्थापक यांचे शिष्टमंडळ मा.जिल्हाधिकारी साहेब गडचिरोली भेट घेवुनसंस्थेच्या समस्यांवर चर्चा केली चर्चे दरम्यान मा.प्रादेशिक व्यवस्थापक मा.गजान्नन कोटलावार उपस्थित होते.आदि.विकास महामंडळाने आधारभुत खरेदी संबधी दि.३ मे २०२३रोजी काढलेल्या अनुषंगिकखर्चाच्या पत्रानुसार हंगाम २०२२/२३ पासुन संस्थेला ०.५० टक्के घट व कमिशन ३१.२५रु. वरुन कमि करुन २०.४०रुपये कमिशन राहिल असे संस्थाना पत्र दिले आहे या मुद्दावर संस्थानी आक्रमक पाऊल उचलुन पुढिल हंगामात रब्बी धान खरेदी करण्यास तयार नाहीत असा आसयाचे निवेदन मा.जिल्हाधिकारी साहेब,मा.आमदार गजबे साहेब व मा.प्रादेशिक व्यवस्थापक कोटलावार साहेब यांना निवेदन देवुन निवेदनात म्हटले की,धानाची उचल वेळीच व शासन निर्णयानुसार होत नाही सहा ते आठ महिने धान खरेदी केंद्रावर साठवणुक करुन ठेवला राहतो त्यामुळे नैसर्गिक रित्या दोन ते तिन टक्के घट येते यापुर्वी दोन टक्के घट मंजुर केली. मागिल हंगामात एक टक्का घट मंजुर होती आता तर ०.५० टक्के केली त्यामुळे आदिवासी संस्थाच्या समस्येत वाढ झाली आहे यामुळे जोपर्यंत कालमानानुसार नैसर्गिक घट मंजुर होत नाही व संस्थेचे कमिशन मध्ये केलेली कपात योग्य व सयुक्तीक नाही अशावेळी जिल्हातील संस्थांचे एकही खरेदी केंद्र सुरु होणार नाही असे निवेदन मा.जिल्हाधिकारी साहेब यांना दिले.
निवेदन देतांना मा.आमदार कृष्णा गजबे साहेब आविका कुरखेडाचे उपसभापती श्री चागदेव फाये ,आविका आंधळीचे उपसभापती श्री विनोद खुणे श्री यशवंत चौरिकर,रत्नाकर धाईत,प्रभाकर जुमनाके, मोतिराम नाईक,अशोक मडावी,उद्धव कापगते,पिलारे,डोनाडकर,आविका कर्मचारी संघटना अध्यक्ष हेमंत सेदरे व्यवस्थापक श्री,महेंद्र मेश्राम,रामदास मस्के,नरेंद्र पटने,लिलाधर घोसेकर,दिवाकर शेंडे ,हलामीजी रांगी,गिरिधर मदनकर,कोपुलवार भाळभिड,हिराजी मेश्राम,मेश्राम घोट,गावतुरेजी,बावणेजी,मेश्राम मालेवाडा,कुकडकर,बंडुजी बोलसरे,कैलास बोलसरे,शेंडे कोरची ईत्यादी कर्मचारी व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.