नागपूर:- वाघांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.भंडारा पथकाने नागपूर वनविभागाच्या संयुक्तपणे ही कारवाई केली.हे आरोपी वाघांच्या मिशांची तस्करी करीत होते.त्यांच्याकडून या मिशा जप्त करण्यात आल्या आहेत.व्याघ्र शिकारीच्या प्रकरणांशी आरोपींच्या संबंधांची चौकशी केली जात आहे.आरोपींमध्ये लाखणी येथील ४२ वर्षीय अशफाक शेख , तवेपार येथील ४९ वर्षीय प्रकाश मते व सावळी येथील ४५ वर्षीय रवींद्र बारई यांचा समावेश आहे.भंडारा येथे वाघांच्या मिशांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाल्याने वनविभागाचे पथक नजर ठेवून होते . नागपूर वनविभागाचे विशेष पथक तयार करून भंडारा विभागाच्या सहकार्याने १ मे रोजी लाखणी वनपरिक्षेत्रात सापळा रचून संयुक्त कारवाई करीत आरोपींना मिशांसह ताब्यात घेण्यात आले.यावेळी आरोपींकडून १७ मिशा जप्त करण्यात आल्या.