मोठी बातमी ! - आता हरवलेला मोबाईल केंद्र सरकार करणार परत - पहा कशी आहे केंद्र सरकारची ही योजना



 तुम्हाला माहिती असेल, अनेक लोक आपला फोन हरवला तर काळजी करू लागतात आणि फोन शोधण्यासाठी पोलिसात तक्रारही करतात, पण त्याचा फारसा उपयोग होत नाही.  

🗣️ त्यामुळे आता ही व्यवस्था पूर्णपणे बदलणार आहे. आता तुमचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला फोन केंद्र सरकार शोधणार आहे, असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. 

💁‍♀️ *पहा काय म्हणाले अश्विनी वैष्णव*

📱 केंद्र सरकारने नवीन पोर्टल सुरू केले आहे या पोर्टलच्या मदतीने तुमचा हरवलेला फोन सहज सापडेल यासाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच लोकांचे हरवलेले फोन आणि वैयक्तिक डेटा सुरक्षित ठेवण्याचा एक प्रभावी मार्ग शोधला आहे. 

✨ केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 'संचार सारथी' पोर्टल सुरू केले आहे. 17 मे म्हणजे उद्यापासून 'जागतिक दूरसंचार दिनानिमित्त' हे पोर्टल लोकांसाठी लाईव्ह असेल, असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.