रेगडीतून अल्पवयीन मुलीचे अपहरण



घोट : रेगडी पोलिस मदत केंद्र हद्दीतून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना ८ मे रोजी घडली. याप्रकरणी ९ रोजी गुन्हा नोंद झाला. रेगडी हद्दीतील १७ वर्षीय मुलीला ८ मे रोजी घोट जवळील श्यामनगर येथील २० वर्षीय तरुणाने
आपल्या मोटारसायकलवर
बळजबरीने बसवून पळवून नेले. मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून रेगडी पोलिस मदत केंद्रात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी युवकाचा शोध सुरु असल्याचे उपनिरीक्षक राहुल बिघोत यांनी सांगितले.