जुनी खरेदी उचलून रब्बी धान खरेदी केंद्र सुरू करा..


प्रितम रामटेके यांची मागणी : ईळदा आदिवासी संस्था
         खरीपाचा धान हंगाम संपला की काही दिवसातच रब्बी धानाची लागवड केली जाते, आता रब्बी धानाची फसल निघून सुद्धा अद्याप धान खरेदी केंद्र सुरू सुरू झाले नाही. अशावेळी शासकीय धानाची विक्री करणाऱ्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था ईळदा यांनी रब्बी धान विक्रीसाठी हमीभाव खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी काँग्रेस कमेटी अनुसूचित जाती तालुका उपाध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्य प्रितम रामटेके यांनी केली आहे. 
                      ग्रामीण भागासह आपला जिल्हा हा शेतीवर अवलंबून आहे, आपला जिल्हा तांदूळ नगरी उत्पादक असा महाराष्ट्रात नावारूपास आहे, त्यापैकी तालुका अर्जुनी/मोर हे धानाचे कोठार समजले जाते. या तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था ईळदा आहे. आदिवासी सहकारी संस्थांमध्ये उन्हाळी म्हणजे रब्बी धानपिक विक्रीसाठी हमीभाव खरेदी केंद्र सूरु करणे आवश्यक आहे. तो अजूनपर्यंत सुरू झालाच नाही. अनेक गावासह भागात धानाची प्रमाणावर लागवड केली जाते. धान पिकविल्या जाते. अनेक परिवार शेतीवरच अवलंबून आहेत. तर याकडे शासनाने महामंडळाने कटाक्षाने लक्ष द्यावे. महामंडळाच्या लापरवाईने खरीपाचा पिक अनेक संस्थांच्या गोडाऊनमध्ये तर परिसरात पडलेला दिसतो. संस्थांमध्ये असलेले धान हा महामंडळाने घेऊन जाऊन उन्हाळी धान खरेदीसाठी खुला करावा अशेही शेतकरी म्हणतात..

*"केंद्र सरकार प्रमाणेच राज्य सरकारने शेतकरी वर्गावर अन्याय करू नये, ही चिंता फार गंभीर आहे, रब्बी धान खरेदी तात्काळ करावी, लवकरच मोबदलाही मिळावा."*
                    *-प्रितम रामटेके*
             *तालुका उपाध्यक्ष*