विजेचा शॉक लागून युवकाचा मृत्यू


घुग्घुस: विजेचा शॉक लागून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवार (दिनांक 11) मे ला सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.शॉक लागून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव सचिन जसवंतसिंग चौव्हाण (34) वर्ष रा. इंदिरानगर, घुग्घुस असे आहेत.

माहितीनुसार सचिन हा घराच्या मागच्या खोलीत गेला व त्याचा जिवंत विद्युत प्रवाह लागून असलेल्या लोखंडी खांबाला हाताचा स्पर्श झाल्याने तो गंभीर जखमी झाला.
गंभीर जखमी अवस्थेत त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.या घटनेची तक्रार पोलीस स्टेशन येथे करण्यात आली. पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.