--------------------------------------------------
ईव्हीएम हे धूर्तपणाने वापरले जाणारे हत्यार आहे. ते बाकीच्यांना राज्याच्या निवडणुका जिंकू देतात आणि दाखवून देतात की, ईव्हीएममध्ये घोटाळा नसतो. कारण त्यांना फक्त गुजरात, उत्तर प्रदेश, लोकसभा जिंकायचे असते. ईव्हीएमचा घोटाळा इथेच होतो. बाकी ठिकाणी राज्ये हातून गेली तर गेली. ईव्हीएममध्ये काही घोळ नाही असा विश्वास ते लोकांना देतात. पण घोटाळा ईव्हीएममध्येच ते करतात, म्हणून इतकी राज्ये जिंकूनही लोकसभेत काहीच होत नाही अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ईव्हीएमच्या मुद्यावर प्रहार केला असला तरी ते अर्धसत्य आहे.
मग पूर्ण सत्य काय आहे? केवळ भाजपाच नव्हे तर कॉंगे्रसनेदेखील तेच केले आहे. हे मात्र आव्हाड यांनी सांगितले नाही. म्हणजे कॉंग्रेस-भाजपा १३० कोटी जनतेला मूर्ख बनवण्याचे काम करत आहेत. हे दोन्ही पक्ष ईव्हीएम घोटाळ्याच्या मुद्यावर गप्प आहेत. २००४-०९ तर २०१४-१९ या चारही लोकसभेच्या निवडणुका अनुक्रमे कॉंग्रेस-भाजपा या दोन्ही पक्षांनी ईव्हीएम घोटाळा करून जिंकल्या आहेत.
हे लोकांना अजिबात कळू नये म्हणून मग काही राज्ये कॉंग्रेसला द्यायची व काही राज्ये भाजपाने घ्यायची. कर्नाटकात कॉंग्रेसला जिंकवण्यात आले आहे. ‘तेरी भी चूप आणि मेरी भी चूप’ दोघेही चिडीचूप. केवळ भाजपाच ईव्हीएम घोटाळा करते आणि कॉंग्रेस करत नाही असे म्हणणे चुकीचे आहे. ईव्हीएम घोटाळ्याचा पाया कॉंग्रेसने घातला त्यावर कळस चढवण्याचे काम भाजपाने केले. म्हणून कधी कॉंग्रेस जाते भाजपा येते तर भाजपा जाते आणि कॉंग्रेस येते. याचा अर्थ आलटून-पालटून ब्राम्हणराज कायम राहते.
म्हणून एकदा सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते की, कॉंग्रेस संपता कामा नये. याचा दुसरा अर्थ कॉंग्रेस संपली तर भाजपला बहुजनांच्या पक्षाचा पर्याय समोर उभा राहिल. एकदा बहुजनांच्या पक्षाचा पर्याय समोर तर ब्राम्हणांच्या भाजपला सत्ता काबीज करता येणार नाही. मग कॉंगे्रस आली तरी ब्राम्हणांचाच पक्ष सत्तेवर येतो. म्हणून कॉंग्रेस संपता कामा नये असा गर्भित अर्थ भागवत यांच्या विधानात दडलेला आहे.
कॉंग्रेस-भाजपा ईव्हीएम घोटाळा करतात, त्यांना केंद्रीय निवडणूक आयोगाचे पाठबळ असल्याशिवाय शक्य आहे का? देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात ईव्हीएम घोटाळा व्हावा म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगच काम करते. म्हणून तर ५६ (सी), ५६ (डी) आणि ४९ एमए अशाप्रकारे निवडणूक विधेयकात सुधारणा करण्यात आले आहे. जगात सर्वात महागड्या निवडणुका भारतात होतात. केवळ निवडणूक आयोगाशिवाय निवडणूक पद्धतीविषयी कुणालाच काही माहिती नाही.
एवढेच कशाला ८ ऑक्टोबर २०१३ रोजी ईव्हीएममुळे मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शी निवडणुका होत नाहीत असा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. याचा दुसरा अर्थ ईव्हीएममध्ये घोटाळा होतो. मग याची माहिती प्रथमत: मीडियाने द्यायला हवी होती, ती त्यांनी दिली नाही. निवडणूक आयोगानेही ही माहिती द्यायला हवी होती. परंतु मतदार, उमेदवार, उमेदवाराचा प्रतिनिधी, राजकीय पक्ष यांना काहीच सांगण्यात आले नाही.
केवळ निवडणुकीचे सोपस्कार पार पाडायचे की आपले काम झाले अशीच एक संकल्पना निवडणूक आयोगाच्या मनात आहे. मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शी निवडणुका घेण्याची जबाबदारी संविधानाने आपल्यावर दिल्याची त्यांना कल्पना आहे. मात्र आपल्या जबाबदारीतून पळ काढायचा असा एकमेव खाक्या निवडणूक आयोगाचा राहिला आहे.
कॉंग्रेस-भाजपाकडून खुलेआमपणे ईव्हीएम घोटाळा केला जात आहे. याबाबत लोकांना जागृत करण्याचे काम भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम करत आहेत. त्यासाठी त्यांनी ईव्हीएम भंडाफोड राष्ट्रव्यापी परिवर्तन यात्रा पार्ट-२ काढली आहे. ही परिवर्तन यात्रा कन्याकुमारी ते कश्मीरपर्यंत आहे. एवढेच नाही तर लोकांना जागृत करून ईव्हीएम फोडण्यासाठी तयार केले जात आहे. कारण ईव्हीएम घोटाळा करण्यास कॉंग्रेस-भाजपा मागेपुढे पाहत नाही. त्यातच निवडणूक आयोगदेखील खुलेआमपणे निवडणूक घोटाळा करण्यास मोकळे रान देत आहे.
यांना धडा शिकवायचा असेल तर सार्या देशभरात ईव्हीएम फोडलेच पाहिजेत. कारण ईव्हीएममुळे मताचा अधिकारच संपुष्टात आला आहे. मताचा अधिकार हा कॉंग्रेस-भाजपा या ब्राम्हणांच्या पक्षाला शासक बनण्यासाठी नव्हे तर बहुजनांनी या देशाचा शासक वर्ग बनावे यासाठी आहे. म्हणून जा आपल्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हांला या देशाची शासनकर्ती जमात बनायचे असे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे ते त्यासाठीच. परंतु भैताड बहुजन ब्राम्हणांनाच शासनकर्ती जमात बनवत आहे. त्यामुळेच कुठल्याच समस्यांचे समाधान होत नाही.
जितेंद्र आव्हाड जे बोलले ते अर्धसत्य आहे. पूर्णसत्य हे असे आहे. त्यांनी भाजपाबरोबर कॉंग्रेसलाही टार्गेट केले पाहिजे. मात्र ते कॉंग्रेसला सोडून देतात ही त्यांची मोठी चूक आहे. जनतेसमोर खरे काय आहे हे सांगणे आमचे काम असल्याने लिहत आहोत. परंतु देशभरात ईव्हीएम घोटाळ्याचा मुद्दा तापत आहे. हा मुद्दा तापत ठेवण्याचे श्रेय केवळ वामन मेश्राम यांनाच जाते. म्हणून कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम फोडण्यात आले. ही केवळ सुरूवात आहे. सार्या देशभरातील लोक ईव्हीएमविरोधात जागृत झाले तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम फोडण्यासाठी मोठा हंगामा होऊ शकतो यात शंकाच नाही.