अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठारगोंदिया : सालेकसा तालुक्यातील ग्राम तेलीटोला येथील नारायण सीताराम कोटांगळे (६५) सायकलने साखरीटोलावरून तेलीटोला येथे जात असताना तेलीटोला येथील वळणावर अज्ञात मोटारसायकल चालकाने त्यांना धडक दिली. त्यांना जखमी अवस्थेत सातगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, २८ मार्च रोजी रात्री १० वाजता त्यांचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात अतुल हिरामण कोटांगले (२९) यांच्या तक्रारीवरून सालेकसा पोलिसांनी भादंवि कलम २७९, ३०४ (अ), सहकलम १३४, १८४ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस हवालदार डोंगरे करीत आहेत.