अनैतिक संबंधातून चुलत दिरासोबत वहिनी लॉजवर गेली , पोलिसांनी दरवाजा तोडला तेव्हा


महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना सांगली जिल्ह्यात समोर आलेली असून अनैतिक संबंधातून झालेल्या वादानंतर चुलत दिराने त्याच्या वहिनीची हत्या केलेली आहे. सांगली जिल्ह्यात आटपाटी शहरातील एका लॉजवर हे हत्याकांड घडलेले असून महिलेचे डोके भिंतीवर आपटत तिचा गळा दाबून आरोपीने खून केलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, छाया देवडकर ( वय 33 वर्ष ) असे मयत महिलेचे नाव असून तिच्या पतीने यासंदर्भात पोलिसात तक्रार दिली आहे. महिलेचा चुलत दीर असलेला नानासाहेब हनुमंत देवडकर याला पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून छाया ही आटपाटी आटपाडीतील विठ्ठलनगर परिसरात पती आणि दोन मुलांसोबत राहत होती. सासरी वाद होत असल्याकारणाने हे कुटुंबीय आटपाडी इथे राहण्यास आलेले होते.


शनिवारी सकाळी बाजार समितीच्या समोर हे असलेल्या एका लॉजमधून कर्मचाऱ्यांना दुर्गंधी येऊ लागली म्हणून त्यांनी खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात यश आले नाही त्यानंतर पोलिसांना याप्रकरणी माहिती देण्यात आली आणि पोलिसांनी दरवाजा तोडून आज प्रवेश केला त्यावेळी छाया देवडकर हिचा मृतदेह आढळून आला होता .

चार मे रोजी आरोपी नानासाहेब याने ही खोली दोघांच्या नावाने राहण्यासाठी बुक केलेली होती. तिथे आल्यानंतर त्यांच्यात पूर्वीच्या अनैतिक संबंधावरून जोरदार वाद झाला त्यामध्ये आरोपीने चुलत वहिनीचे डोके भिंतीवर आपटत तिचा गळा दाबून खून केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . घटना घडल्यानंतर आरोपीने तेथून पलायन केलेले होते मात्र दोन दिवसांनी मृतदेहाची दुर्गंधी पसरल्यानंतर ही घटना समोर आलेली आहे. आरोपी हा देखील विवाहित असून त्याला देखील दोन मुले आहेत. लॉजवरील नोंदीच्या आधारे त्याला ताब्यात घेण्यात आलेले आहे.