लोहखनिजाच्या ट्रकने एक गंभीर





 धानोरा : लोहखनिज भरून जात असलेल्या ट्रकची दुचाकीस धडक दिल्याने, दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना मुरुमगाव येथे मुख्य मार्गावर मुख्य चौकात २ मे रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली.

हुमनसिंग किरसान (४२) रा.बेलगाव असे जखमीचे नाव आहे. सीजी ०८ एबी ९२९५ या क्रमांकाचा ट्रक सुरजागड येथील लोहखनिज

आणण्यासाठी रायपूर येथून जात होता. दरम्यान, विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.

त्याला मुरुमगाव आरोग्य केंद्रात उपचार करून धानोरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. सुरजागड येथील लोहखनिज भिल्लाई येथील कारखान्यात नेले जाते. त्यासाठी दिवसातून शेकडो ट्रक धावत राहतात. परिणामी, अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.