ब्रेकअप' नंतर प्रियकराने प्रेयसीला प्रेमाचा आग्रह धरला आणि तीने नकार दिल्यानंतर प्रियकरानेच प्रेयसीची कटरने गळा कापून निघृण हत्या


अमरावती, :  'ब्रेकअप' नंतर प्रियकराने प्रेयसीला प्रेमाचा आग्रह धरला आणि तीने नकार दिल्यानंतर प्रियकरानेच प्रेयसीची कटरने गळा कापून निघृण हत्या केली. इतकेच नव्हे तर त्याने स्वता: ही हातावर कटर मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिस सुत्रानुसार, संजना शरद वानखडे (19, रा. कांडली, परतवाडा) असे मृत मुलीचे नाव असून, सोहम गणेश ढोले (रा. परतवाडा) जखमीचे नाव आहे. बुधवारी सकाळी बडनेरा स्थित वडूरा गावाजवळ तरुणी मृतावस्थेत आढळून आली, तर एक तरुण जखमी अवस्थेत आढळून आल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. या घटनेमुळे अमरावती जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.