वरूड, (वा.). शहरातील घाटोळे प्लॉटमध्ये राहणारे दोन सख्खे भाऊ एकमेकांचे वैरी झाले आणि एका भावाने दुस-या भावाच्या डोक्यावर फरशी मारून जखमी केले. ही घटना मंगळवारी दुपारी 4 वाजताच्या दरम्यान घडली. या प्रकरणात वरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सुत्रानुसार, योगेश विजय पानसे (रा. घाटोळे प्लॉट वरूड) असे जखमीचे नाव आहे. तर संकेत विजय पानसे असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. घटनेच्या दिवशी संकेत व विजय या दोघा भावांमध्ये घर व शेतीच्या हिस्सावरून वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की, संकेतने चक्क बाजूला असलेली फरशी घेऊन योगेशच्या कपाळावर मारली. यामध्ये योगेशचे डोके फुटले असून तो रक्तबंबाळ झाला.