बाप-लेकाचा जागीच मृत्यू..जिवती :- जिवती येथे काही कामानिमित्त तीन मुलांना घेऊन दुचाकीने जात असताना अचानक दुचाकी पुलाला आदळली. त्यात दुचाकीवरील बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवरील अन्य दोन मुले जखमी झाली. ही घटना सोमवारी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या रोडगुडाजवळील पुलावर घडली.

सचिन राजाराम गायकांबळे (४०) व त्यांचा मुलगा अनुष सचिन गायकांबळे (७, दोघेही रा. केकेझरी) अशी मृतांची नावे आहेत तर राजेश नागनाथ गायकांबळे (८), हृषिकेश बापूराव गायकांबळे (१३ दोघेही रा. केकेझरी) अशी जखमी मुलांची नावे आहेत. गंभीर जखमी मुलांना उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र जिवती येथे दाखल केले असता त्यांना सुमारास पुढील उपचाराकरिता गडचांदूर येथे रेफर करण्यात आले. तिथूनही त्यांना हलविण्यात आले. दोघांपैकी राजेश नागनाथ गायकांबळे (८) याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.