गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील ग्राम तिल्ली मोहगाव येथील छगनलाल हेतराम पटले (५१) यांच्यावर जादूटोण्याचा संशय घेत तुझ्यामुळे माझी मुलगी मरण पावली असे म्हणत आरोपी प्रेमलाल परसराम रहांगडाले (५३), हेमंतकुमार प्रेमलाल रहांगडाले (३०), पुस्तकाला प्रेमलाल रहांगडाले (५०) व प्रेमलाल रहांगडाले यांची सून (सर्व रा. तिल्ली - मोहगाव) यांनी शिवीगाळ करून मारहाण केली.
६ मे रोजी दुपारी १:३० वाजतादरम्यान घडलेल्या या घटनेत आरोपींविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी अधिनियम माणूस अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३, ६, भादंविच्या ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
तपास पोलिस हवालदार पटले करीत आहेत.