Crime in Jalna: पारेगावात आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फसणारी घटना घडली आहे. एका 65 वर्षीय वृद्ध आईवर 27 वर्षीय नाराधाम मुलाने लाकडी दांड्याने मारहाण करीत एकाच रात्रीत तीन ते चार वेळा बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडालीय. (Latest Marathi News)
पारेगावातील 65 वर्षीय वृद्ध महिला आपल्या वृद्ध आणि अपंग पतीसोबत राहते सदरील महिलेचा पती एका पायाने अपंग असल्यामुळे भिक्षा मागून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात त्यांना एक 27 वर्षीय राहुल गौतम गायकवाड नावाचा एक मुलगा देखील आहे. राहुल हा अविवाहित असून, नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या शेतात सालगाडी म्हणून तो कामाला आहे.
1 मे ला राहुल गायकवाड हा सुट्टी घेऊन जालना तालुक्यातील पारेगाव आला होता आपला मुलगा खूप दिवसांनी गावी आल्याने आईने त्या दिवशी रात्री त्याच्यासाठी गोड जेवण बनवले. जेवण झाल्यानंतर वृद्धा महिला आणि नराधम मुलगा घराच्या अंगणात झोपले होते. राहुल याने रात्री 12 वाजळल्याच्या सुमारास वडील भिक्षेसाठी जालना येथे गेल्याने, ते परत आले नसल्याची संधी साधतं आपल्या पायाला काहीतरी चावले आहे, घरात चल लाईटच्या उजेडात पाहा असे सागतं आईला घरात घेऊन जाऊन आईवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. (Jalna Crime)
आईने त्याला विरोध केला तेव्हा राहुल ने घरातील लाकडी दांड्याने आईला जबर मारहाण करत तिच्यावर तीन ते चार वेळा बलात्कार केला. त्यानंतर हा नराधम मुलगा नाशिक जिल्ह्यातील सिन्नरला निघून गेला. भयभीत झालेल्या या वृद्धेने घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या शेवगा येथील आपल्या बहिणीला सांगितला. नंतर बहिणीने महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
त्यानंतर मौजपुरी पोलीस (Police) ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपी मुलाविरोधात 376, 324, 506कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश धोंडे यांनी पोलिसांच पथक सिन्नर येथे पाठवून नराधम राहुल याला अटक केलीय. या प्रकरणी अधिक तपास मोजपुरी पोलीस करत आहे.