अवकाळी पावसामुळे अनेक कुटुंबे उघड्यावर
 कोरची : मागील दोन दिवसांपासून कोरची तालुक्यात सतत पाऊस कोसळत असल्याने शहरातील वॉर्ड क्रमांक १६ येथील रहिवासी नानाजी मोहुर्ले यांच्या घराची भिंत कोसळली. त्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे.

नानाजी मोहुर्ले यांची परिस्थिती हलाखीची असून ते आपल्या कुटुंबीयांसोबत मातीच्या घरात वास्तव्य करतात. मात्र मागील तीन • दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे घराची भिंत कोसळल्याने मोहुर्ले यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. घटनेच्या वेळी नानाजी मोहुर्ले हे कामानिमित्त बाहेर गेले होते. तर कुटुंबातील इतर सदस्य बाहेरगावी गेले असल्यामुळे सुदैवाने जीवितहानी

टळली. परंतु आता राहायचे कुठे, असा प्रश्न मोहुर्ले कुटुंबीयांना पडला आहे. अचानक झालेल्या नुकसानीमुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनातर्फे आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी नानाजी मोहुर्ले यांनी केली आहे.