चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना प्रकल्प गडचिरोली यांची सहचार सभा संपन्न

 
आज दिनांक 10/5/2023 बुधवार ला दुपारी बारा वाजता आरमोरी तालुक्यातील वैरागड येथे महाराष्ट्र राज्य चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री संखेसाहेब उपाध्यक्ष माननीय श्री सचिन जी हरिचंद्र तथा श्री रत्नाकरजी मळावी अध्यक्ष नागपूर विभाग व श्री पीजी गायकवाड विभागीय सचिव नागपूर व श्री राठोड साहेब अध्यक्ष अमरावती प्रकल्प यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने सभा घेण्यात आली या सभेला नागपूर विभागीय महिला अध्यक्ष सौ यामिनी ताई रामटेकेयांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली या सभेला गडचिरोली प्रकल्प अध्यक्ष माननीय श्री जितेंद्र दोडके गडचिरोली प्रकल्प सचिव श्री तेजस घुटके श्री pipre हरीदास पत्रे श्री gurudas sawsagde तसेच संघटनेतील सर्व सभासद उपस्थित होते या सभेला विविध विषयावर चर्चा करण्यात आली प्रास्ताविक श्री जितेंद्र दोडके मी केले व मागील सभेचे इतिवृत्त संघटनेचे सचिव माननीय श्री तेजस गुटके यांनी समोर वाचून दाखवले संघटनेत बऱ्याच महिलावर्गांनी उपस्थिती दर्शवली होती व पुरुष वर्ग सुद्धा उपस्थित होते सभेचे संचालन श्री बोकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन राकडे यांनी केले राष्ट्रगीतांनी सभेची सांगता करण्यात आली