अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जखमी

चिमूर : उमरेड- भिसी- चिमूर महामार्गावर येरखडाजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. तो जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून होता. याचदरम्यान, काँग्रेस युवा नेते दिवाकर निकुरे हे नागपूरवरून चिमूरकडे येत असताना रस्त्याच्या कडेल जखमी युवक पडून दिसताच निकुरे यांनी जखमीला उचलून स्वतःच्या गाडीत टाकून चिमूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. महादेव चौधरी रा. पारडपार ता. चिमूर असे जखमीचे नाव आहे. घटनेची माहिती चिमूर पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार गभने यांनी अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पुढील तपास ठाणेदार मनोज गभणे यांच्या मार्गदर्शनात मेहरकुरे, शैलेश मडावी करीत आहे.