वनश्री कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील १८ विद्यार्थिनींना मिळाल्या सायकलीकोरची :- स्थानिक वनश्री कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात मानव विकास मिशन योजने अंतर्गत एकूण १८ विद्यार्थिनींना महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सायकलीचे वाटप करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. व्ही. टी. चहारे यांच्या अध्यक्षतेखाली व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. मनोजभाऊ अग्रवाल, कोरची पोलिस स्टेशनचे ए. पी. आई मा. जी. के. फुलकवंर साहेब, पी.आय. मा. अमोल फडत्तरे साहेब, समाजसेवक मा. आशिष अग्रवाल, प्रा. आर. एस. रोटके, प्रा. जितेंद्र विनायक, प्रा. महेश्वर बनसोडे, प्रा. संतराम धिकोडी, प्रा.गजाधर देशमुख, प्रा. किशोर वालदे, प्रा. निलकंठ फुंडे, प्रा. जुली बाराहाते, मनिष लाडे, प्रकाश शेंडे, विनायक शेंडे, बालक साखरे, तेजराम मडावी, खुशाल मेश्राम पालक वर्ग तथा विद्यार्थींनीच्या उपस्थितीत एकूण १८ विद्यार्थिनींना सायकलीचे वितरण करण्यात आले. याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.