ठळक बातम्या*



*📣महाराष्ट्रात मार्च महिन्यात बेपत्ता झालेल्या मुलींची संख्या २२००*

जानेवारीमध्ये राज्यातून १६०० मुली बेपत्ता झाल्या होत्या. फेब्रुवारीमध्ये १८१० तर मार्च महिन्यात बेपत्ता झालेल्या मुलींची संख्या ही २२०० वर पोहोचली आहे.

*📣ब्रिजभूषण सिंग यांना १५ दिवसात अटक करा, शेतकऱ्यांची मागणी*

पैलवानांच्या आंदोलनाला शेतकरी संघटना आणि खाप पंचायतींनी समर्थ दिलेलं आहे. जंतर मंतरवर मोठ्या संख्येने शेतकरी पोहोचले असून आता त्यांनी ब्रिजभूषण यांना अटक करण्याची मागणी केली आहे.

*📣काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी देशभर गुन्हे दाखल करणार*

कर्नाटकमधील भाजप उमेदवार माणिक राठोड याने काँग्रेस अध्यक्ष मा. मल्लिकार्जुन खर्गे यांना आणि त्यांच्या परिवाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याची बाब अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने गंभीरतेने घेतली असून संपूर्ण देशात प्रत्येक तालुका पोलीस स्टेशन मध्ये FIR दाखल करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. आज सोलापूर जिल्हा दौऱ्यादरम्यान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे याबाबत तक्रार करण्यात आली.

*📣पश्चिम बंगाल सरकारने 'द केरळ स्टोरी' या चित्रपटावर बंदी*

पश्चिम बंगाल सरकारने 'द केरळ स्टोरी' या चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. द्वेष आणि हिंसाचाराची कोणतीही घटना टाळण्यासाठी आणि राज्यात शांतता राखण्यासाठी हा निर्णय घेतलाय... असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सपष्ट केले...

*📣कर्नाटक निवडणुकीपुर्वी तीन सर्व्हेमध्ये काँग्रेस मोठ्या बहुमताने सत्तेत येणार*

एबीपी-सीव्होटर च्या ओपिनियन पोलनुसार, कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. पोलच्या आकडेवारीनुसार, कर्नाटकातील 224 विधानसभा जागांपैकी काँग्रेस 107 ते 119 जागा जिंकू शकते, तसेच 'जेडीएस'ला केवळ 25 ते 35 जागा मिळण्याची शक्यता आहे. या सर्वेक्षणात भाजप काँग्रेसपेक्षा पाच टक्के मतांनी पिछाडीवर आहे, म्हणजेच भाजपला 35 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 40 टक्के मते मिळू शकतात. तसेच 'जेडीएस'ला 17 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.

'इंडिया टुडे सी व्होटर'च्या ओपिनियन पोलनेही कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होण्याची शक्यता वर्तवली आहे. पोलनुसार 2018 च्या निवडणुकीपेक्षा भाजपला 24 जागा कमी मिळतील, म्हणजेच भाजप यावेळी फक्त 74-86 जागा जिंकू शकेल असे त्यामध्ये नमूद करण्याच आले आहे. 'इंडिया टुडे' च्या पोलनुसार, काँग्रेस पक्षनेते सिद्धरामय्या यांना सर्वाधिक पसंतीचे नेते म्हणून 42 टक्के मतांनी पसंती दर्शवली आहे. तर भाजपचे विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना 31 टक्के मतांसह दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक पसंतीचे नेते म्हणून पोलमध्ये दाखविण्यात आले आहे.

कन्नड मीडिया आउटलेट एडिनाने आपल्या पोलमध्ये दावा केला आहे की, काँग्रेस 132 - 140 जागा जिंकून प्रचंड बहुमताकडे वाटचाल करत आहे. तर भाजपला 33 टक्के मतांसह 57 जागा जिंकणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे