वरोरा : शहरातील एका अल्पवयीन मुलीने पोट दुखत असल्याचे घरच्यांना सांगितल्यानंतर तिला रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांच्या तपासणीतून तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले.
शुक्रवारी रुग्णालयातून वैद्यकीय अहवाल वरोरा पोलिस ठाण्यात पोहोचल्यानंतर अल्पवयीन मुलीला गर्भधारणा करणाऱ्या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी युवक फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.