पोरला वनपरिक्षेत्रां अंतर्गत उपशेत्र मरेगाव देलोडा बीटा मध्ये वनविभागाकडून लाखो रुपयांचे सागवान जप्त....


जप्ती मध्ये एक ट्रक ट्रॅक्टर यांचा समावेश...,.......

दिनेश बनकर कार्यकारी संपादक सुपर फास्ट बातमी
7822082216
आरमोरी 
मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या पोरला वनपरिक्षेत्र उपशेत्रा मरेगाव देलोडा बीटा मध्ये वनविभागाच्या वतीने व गावकऱ्याकडून मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे वनविभागाने सापडा रचून एक मे ला महाराष्ट्र दिनी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास लाखो रुपयाचा अवैध सागवान व ट्रॅक्टर वडधा गावाजवळ पकडून जप्ती केला. सदर जप्त सागवान लाकूड हा वडधा येथील खसऱ्यामधील घेतलेल्या लाकडांमध्ये समाविष्ट करून ट्रक द्वारे नागपूरला विक्री करिता जाणार होता अशी माहिती आहे . 







 सदर जप्तीमाल हा ठाणेगाव येथील लाकूड घेणाऱ्या ठेकेदाराच्या असल्याचे बोलले जात आहे या प्रकरणांमध्ये वनविभागाच्या वतीने कोणत्या स्वरूपाची कारवाई केली जाणार याकडे जनतेचे कटाक्षाने लक्ष लागून असल्याचे दिसून येत आहे सागवान जप्ती प्रकरणाचा पुढील तपास वडसा उपवनसंरक्षक यांच्या मार्गदर्शना खाली पोरला वनपरिक्षेत्र अधिकारी मडावी क्षेत्र सहाय्यक अंबादे व त्यांची टीम करीत आहे शासन एकीकडे शंभर कोटी वृक्ष लागवड आणि जंगल वाढीसाठी प्रयत्न करीत असताना दुसरीकडे मात्र शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय अवैध झाडाची कत्तल करून शासनाचा महसूल कुठेतरी बुडवण्याची बाब या प्रकरणावरून समोर येत असल्याचे दिसत आहे मात्र वनविभागाने कर्तव्यदक्ष राहून या असल्या सागवान वृक्षतोड करून लवकरात लवकर श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाकूडतस्करांना चांगली अद्दल घडवावी असे सामान्य जनतेतून बोलले जात आहे