*आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या प्रयत्नातून आयोजित रोजगार मेळाव्याला उपमुख्यमंत्र्यांनी आवर्जून लावली उपस्थिती*
*कृषी महाविद्यालय गडचिरोलीच्या सभागृहामध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळावा संपन्न*
*उत्खनन करणाऱ्या परराज्यातील ६० कंपन्यांना जिल्ह्यातील प्रत्येकी २०-२५ लोकांना नोकरी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन*
*दिनांक २ मे २०२३ गडचिरोली*
*एकीकडे उद्योजक आपल्या कामासाठी माणसे कमी असल्याचे सांगतात तर दुसरीकडे सुशिक्षित तरुण तरुणी काम मिळत नसल्याने बेरोजगार असल्याचे सांगतात. शिक्षण घेतले मात्र त्यात कोणतेही नाही.*
*त्यामुळे ज्या व्यक्तीकडे कौशल्य आहे अशा व्यक्तीच्या हाताला काम मिळणारच तो कधीही बेरोजगार होऊ शकणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री ना देवेंद्रजी फडणवीस यांनी गडचिरोली येथे आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांच्या प्रयत्नातून आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याच्या प्रसंगी उपस्थित नवयुवक तरुण तरुणींना मार्गदर्शन करताना केले.*
*यावेळी मंचावर खासदार अशोकजी नेते, आमदार डॉक्टर देवरावजी होळी, आमदार कृष्णाजी गजबे, जिल्हाधिकारी संजय कुमार मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वादजी, जिल्ह्याचे भाजपा अध्यक्ष किसनजी नागदेवे ,ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे , जिल्हा कौशल्य विकास अधिकारी योगेंद्रजी शेंडे,जिल्ह्याचे महामंत्री रवींद्रजी ओलारवार , आदिवासी आघाडीचे प्रदेश महामंत्री प्रकाश गेडाम उपविभाग्य अधिकारी मैनकजी घोष प्रामुख्याने उपस्थित होते.*
*याप्रसंगी देवेंद्रजी फडणविस म्हणाले की गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुरजागड प्रकल्प होण्यापूर्वी या ठिकाणी टाटानगर भिलाई येथील पोलाद प्रकल्प उभारण्याचा तत्कालीन प्रयत्न होता परंतु तेथे झालेल्या विरोधामुळे आज ते प्रकल्प होऊ शकले नाहीत मात्र ते प्रकल्प जिथे झाले त्या ठिकाणी मोठे शहर निर्माण झाले असून त्या भागाचा संपूर्ण विकास झालेला आहे. त्यामुळे आमची सरकार आल्यानंतर लगेच सुरजागड लोह प्रकल्पाला तातडीने सुरू करण्याची परवानगी दिली.आता लवकरच कोणसरी येते ही पोलिस प्रक्रिया प्रकल्प सुरू होणार असून त्याच्या प्राथमिक टप्प्याचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. ज्या कंपन्यांच्या माध्यमातून सुरजागड लोह प्रकल्पामध्ये उत्खनन केल्या जाते त्या कंपन्यांना गडचिरोली जिल्ह्यातील नवयुवक तरुण तरुणींना प्राधान्याने नोकरी उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासन स्तरावरून प्रयत्न केले जातील असे ते म्हणाले .याप्रसंगी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनीही उपस्थित नवयुवकांना मार्गदर्शन केले व रोजगार घेणारां नाही तर रोजगार देणारे आपण बनले पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले.*