इसमाने मोहाच्या झाडाला गळफास लावुन केली आत्महत्या


नागभीड : तालुक्यातील इरव्हा येथील एका इसमाने मोहाच्या झाडाला गळफास लावुन आत्महत्या केली. ही घटना (ता. 2) मंगळवारी सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. प्रकाश महादेव सावसागडे (वय 41 ) असे मृतकाचे नाव आहे. तो कांपा येथील रहिवासी आहे. मृतकाने स्वत:ची शर्ट काढुन मोहाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सकाळी शेतात जात असतांना शेतकऱ्यांना प्रेत झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला.