किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान खरेदीकरीता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरीता मुदतवाढ



गडचिरोली,(जिमाका)दि.04 : गडचिरोली जिल्ह्यातील सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांना कळविण्यात येते की, शासन पत्र दिनांक 20 मार्च 2023 अन्वये रब्बी पणन हंगाम 2022-23 मध्ये किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान खरेदीकरीता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरीता दिनांक 30 एप्रिल 2023 अखेरपर्यंत मुदत देण्यात आलेली होती. तथापी शासन पत्र दिनांक 2 मे 2023 अन्वये रब्बी पणन हंगाम 2022-23 मध्ये किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान खरेदीकरीता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरीता दिनांक 15 मे 2023 अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यान्वये जिल्ह्यातील सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांनी विहित मुदतीत ऑनलाईन पोर्टलवर (NeML) नोंद करावी असे जिल्हा पुरवठा अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.
****