लोहारा - करपडा मार्गावर दोन दुचाकीची टक्कर एक जण जखमी


वैरागड: प्राप्त झालेल्या माहितीनुसार करपडा - लोहारा या रस्त्यावर अंदाजे साडेसात वाजता दोन दुचाकीची टक्कर झाल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज घडली .

लोहारा करपडा या मार्गावर नेहमीच वाहनाची वर्दळ असते. अशातच आज साडेसातच्या दरम्यान दोन दुचाकीची समोरासमोर जोरदार टक्कर झाली त्या टक्कर मध्ये राजेंद्र गेडाम शीर्सी यांच्या डोक्याला मार लागला आहे. तर सहकारी शिर्सि येथील मुखरु शिडाम यांना सुद्धा किरकोळ मार लागल्याची माहिती मिळालेली आहे.


तसेच दुसरे दुचाकीस्वार सुकाळा येथील सुरेश कुमरे, सोमेश kannake यांना सुद्धा किरकोळ मार लागला आहे.

या घटनेची माहिती मिळताच पंचायत समितीचे उपसभापती विनोद बावनकर यांनी जखमीला तात्काळ मदत करून प्राथमिक आरोग्य केंद्र वैरागड मध्ये हलविण्यात आले अशी माहिती प्राप्त झालेली आहे.