बापरे! धावत्या बसमध्ये आली चालकाला भोवळ





बस उलटली : सुदैवाने प्रवासी सुखरूप

शंकरपूर : चालकाला अचानक भोवळ आल्याने नियंत्रण सुटून बस उलटल्याची घटना चिमूर तालुक्यातील नवतळा येथे बुधवारी दुपारी घडली. या घटनेत नऊ प्रवासी किरकोळ जखमी झाले. वाहनचालकाच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली.

चिमूर नवतळा-कांपा मार्गे एक नवतळा गावाकडे निघाली. दरम्यान, मजरा तलावाजवळ चालक चालक एम. डी. उईके यांना भोवळ आल्याने

बस रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. बसमध्ये नऊ प्रवासी होते. परंतु सुदैवाने कोणालाच गंभीर दुखापत झाली नाही. बस उलटल्याची माहिती मिळताच शेतकरी मदतीला धावून आले. त्यांनी प्रवासी वाहनचालक व वाहकाला बाहेर काढले.

या घटनेनंतर काही तासांतच आगार व्यवस्थापक एस. टी. शिंदे व वाहतूक नियंत्रक सुरज मून यांनी घटनास्थळी भेट दिली. गावकन्यांशी चर्चा करुन माहिती जाणून घेतली...