वडसा येथील नटीने घेतला गळफास


वडसा:-

आपल्या राहत्या घरात नाट्य नटीने गळफास घेऊन केली आत्महत्या सदर मुलीचे नांव आनंदा नैताम असून ती झाडीपट्टीतील नाट्यकलावंत आहे. काल रात्रौलाच तीने भाड्याने राहत असलेल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर प्रकार आज सकाळी लक्षात आला. देसाईगंज पोलिसांनी पंचनामा करून शव ग्रामीण रुग्णालय वडसा येथे शवविच्छेदना करीता पाठविले. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण रासकर यांचे मार्गदर्शनात सुरू आहे.