रेल्वे प्रशासनाचे ओझे नगर परिषदेच्या खांद्यावरदेसाईगंज:  संततधार अवकाळी पावसाने देसाईगंज तालुक्यातिल जनजिवन विस्कळित झाले त्याची झड दे गंज शहरातही पडली असुन रेल्वे च्या अंडर ब्रिज मध्ये पाणि साचल्याने रहदारिची मोठी समस्या निर्माण झाल्याने रेल्वे प्रशासनाने जरी जबाबदारी झटकली असली तरि नगर परिषदेने माञ रस्ता सुरळीत करण्यासाठी तिन दिवसापासुन युद्धपातळीवर काम सुरु केले असुन रेल्वे प्रशासनाचे ओझे नगर परिषदेच्या खांद्यावर असल्याचे चिञ पहावयास मिळत आहे देसाईगंज शहराच्या मध्यभागी असलेल्या रेल्वे स्टेशनमुळे शहरातिल जनतेला नेहमीच आवागमनाची समस्या भेडसावत होती वारंवार रेल्वे फाटक वर लोकांना होणारा ञास पाहता रेल्वे प्रशासनाला पञव्यवहार करुन नगर प्रशासनाने रहदारी सुकर व्हावी यासाठी अंडरब्रिज ची निर्मिती करण्याची मागणी केली सदर मागणी पुर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अंडरब्रिज निर्मिती चे टेंडर ही काढले माञ काम कासव गतिने का होई ना पण अनेक वर्षानंतर पुर्ण झाले माञ रहदारी ची समस्या कायमच राहिली भर पावसाळ्यात ह्या अंडरब्रिज ला नाल्या धोड्याचे स्वरुप प्राप्त होते अश्या परिस्थितीत नगर परिषदेचे कर्मचारी जिवाचे रान करुण वाहतुक सुरळीत करण्याचा प्रयत्न करतात येणारे जाणारे लोक संपुर्ण दोष नगर प्रशासनाला देतांना दिसतात माञ रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत कोनतेही काम करण्याची परवानगी रेल्वे विभाग देत नाही सर्वसामान्य नागरिकांना आपल्या हद्दीत फिरकुही न देणारे रेल्वे प्रशासन आपली जबाबदारी कशी काय झटकु शकते एप्रिल महिण्याच्या शेवटच्या आठवड्या पासुन आज पर्यंत पावसाच्या सरी सातत्याने कोसळत असुन अंडरब्रिज ला नाल्या ढोड्याचे स्वरुप प्राप्त झाल्याने रहदारी ची समस्या निर्माण होताच दे गंज नगर प्रशासनाने कंबर कसुन अंडर ब्रिज मधिल पाणी इंजिन च्या साह्याने वाहुन नेत सफाई कर्मचारी दुर्गंधी युक्त चिखल गाळ सतत तिन दिवसापासुन उपसुन रस्ता सुरळीत करण्याचा प्रयत्न करत असतांना आवागमन करणारे लोक यांच्यावरच रोष उगारतांना दिसतात खरे पाहता ही जबाबदारी नगर परिषदेची नसुन रेल्वे प्रशासनाची असुन रेल्वे प्रशासनाचे ओझे वाहनार्या नगर परिषदेने हात झटकले तर याहीपेक्षा बिकट परिस्थितीचा सामना नागरिकांना करावे लागेल हे समजुन घेणे महत्वाचे ठरते