देसाईगंज: अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक, एक ठार तर एक जखमी


गडचिरोली (GADCHIROLI) जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील मोहटोला, शिरपुर, विहीरगांव फाट्यावर अज्ञात वाहनाने दुचाकिला धडक दिल्याने दुचाकी वरील एक जण जागीच ठार झाला, तर दुसऱ्याला उपचाराकरीता रुग्णालयात दाखल केले. ही घटना मंगळवारी दुपारी दीड वाजता घडली.
पंकज भजभुजे रा. टेंबा (तह. आरमोरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. मागील वर्षी त्याचा विवाह झाला होता. काही कामानिमित्त तो बाहेरगावी मित्रासोबत दुचाकीने गेला होता. देसाईगंज तालुक्यातील मोहटोला, शिरपुर, विहीरगांव फाट्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक देणारे वाहन घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी धाव घेतली. यात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमीचे नाव केशव नागोसे (टेंभा) आहे. त्याला विहीरगाव येथील आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले होते.