प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच काढला पतीचा काटा!…काही तासातच गुन्हा उघड…


अमरावती : जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस स्टेशन शिरखेड पोलीस हद्दीत राजुरवाडी शेत शिवारात मृतदेह बेवारस स्थितीत आढळून आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, घटनास्थळी ४७ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला किसन वसंत धुर्वे, वय ४५ रा. राजुरवाडी असे मृतकाची नाव आहे. तर मृतकाचा गळा आवळून खून केल्याचे प्रथम निदर्शनात आल्यानंतर पोलिसांनी तपास चक्रे फिरवली व अवघ्या काही तासातच खुनाचा उलगडा करण्यात आला.

अमरावती ग्रामिण जिल्हयातील पो.स्टे. शिरखेड येथे दि. ०१/०५/२०२३ रोजी फिर्यादी नामे सतिश वसंतराव धुर्वे, वय ४७ वर्षे, रा. आलवडा यांनी तक्रार दिली की, त्यांचा भाऊ मृतक नामे किसन वसंत धुर्वे, वय ४५ रा. राजुरवाडी यांचा राजुरवाडी शेत शिवारात मृतदेह बेवारस स्थितीत मिळुन आला असुन सदर मृतक यांचा कोणीतरी अज्ञात आरोपीतांनी गळा आवळुन खुन केला असल्याचे प्राथमीक स्तरावर दिसुन येत आहे.

सदर प्राप्त तक्रारीचे अनुषंगाने घटनेचे गांर्भिय लक्षात घेता, घडलेल्या गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मा. अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. यांनी अधिनस्थ पोलीस अधिकारी यांना मार्गदर्शन करून आदेशित केले. सदर घटनेचे अनुषंगाने श्री. शशिकांत सातव, अपर पोलीस अधिक्षक, अमरावती प्रा. श्री. निलेश पांडे, उप विभागीय पोलीस अधिकारी, मोशी, श्री. तपन कोल्हे, पो. नि. स्था. गु.शा., अमरावती ग्रा. यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवुन घटनास्थळाची पाहणी केली.

घटनास्थळाची पाहणी करून अधिनस्थ पथकास गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने सुचना देण्यात आल्या असता पथकाने सदर गुन्हयातील मयत यांची व त्यांचे कुटूंबीयांची पार्श्वभुमी बाबत सविस्तर माहीती घेतली असता गोपनिय माहीती प्राप्त झाली की, मयत हयाचे पत्नीचे गावातीलच आरोपी इसम नामे बबलू ऊर्फ इजाज खाँ शब्बीर खाँ पठाण, वय ४० रा. राजुरवाडी याचे अनैतीक संबंध असुन सदर बाब मयत याचे लक्षात आली असता तो त्याचे पत्नीस शाररीक व मानसिक त्रास देवु लागला होता.

सदर बाबत त्याच्या पत्नीने तिच्या प्रियकरास सांगतली असता त्याने त्याचे साथीदाराससह मयत हयाचा खुन करण्याचा कट रचून दि. २९/०४/२०२३ रोजी राजुरवाडी शेत शिवारात मयत यास बोलावून नेले व तेथे त्याचा गळा आवळून खुन केला असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सदर गुन्हयात मयत हयाचे पत्नीचा प्रीयकर १) बबलू ऊर्फ इजाज खाँ शब्बीर खॉ पठाण, वय ४० रा. राजुरवाडी त्याचे साथीदार २) सागर रमेशराव मातकर, वय ३० वर्षे, रा. राजुरवाडी ३) कृणाल जानराव उईके, वय २४, रा. तळेगाव ठाकुर ४) विधीसंघर्षीत बालक रा. तळेगांव ठाकुर यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी गुन्हयांची कबुली दिली आहे.सदरची कार्यवाही मा. श्री. अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक,

अमरावती प्रा. श्री. शशिकांत सातव, अपर पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. श्री. निलेश पांडे, उप विभागीय पोलीस अधिकारी, मोशी यांचे मार्गदर्शनात श्री. तपन कोल्हे.पो. नि., स्था. गु.शा., अमरावती ग्रा. यांचे नेतृत्वात स.पो.नि. विष्णु पांडे, पो.उप.नि.नितीन चुलपार, पोलीस अमलदार संतोष मंदाणे, बळवंत दाभणे, पंकज फाटे, मनोज टप्पे, शकील चव्हाण, मोहन मोरे, सांगर धापड, चेतन गुल्हाने, प्रमोद शिरसाठ महीला पो. अमलदार सरिता चौधरी यांचे पथकाने केली आहे…