ब्रम्हपुरी या देशात अनेक विचारवंत धोर महापुरुष होऊन गेले त्यांनी मानव जातीच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करून नवे विचार दिले भलेही महापुरुषांना समाजकंटकांनी संपविले परंतु त्यांनी दिलेल्या विचारांना कोणीच संपवू शकत नाही. असे दलित मित्र प्रा. डी. के. मेश्राम यांनी आपले मत व्यक्त केले.

रणमोचन येथील बुद्ध जयंती निमित्ताने आयोजित केलेल्या कमलेश भोयर आणि संच यांचा भीम बुद्ध संगीतमय प्रबोधन कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटक म्हणून प्रा. डी. के. मेश्राम रसिकांना संबोधित करत होते ते पुढे म्हणाले तथागत बुध्दाने जगाला धम्म दिला आणि परमपूज्यभारतरत्न डॉ. बाबासाहेबांनी देशाला भारताचे संविधान दिले या अभूतपूर्व देणग्यातून संपूर्ण मानव जातीचे कल्याणच होणार आहे. धम्म हा मानवाला शांती आणि सुखाचा मार्ग दाखवतो तर संविधान हे न्याय स्वातंत्र्य बंधुता आणि समता प्रस्थापित करून सर्वाना सुखाचे जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देतो परंतु समाज कटकाला अशांतता पसरवून जातीजातीत दुद्वेष निर्माण करायचा असल्यामुळे पवित्र संविधान जाळण्याचेकाम करत आहेत. 

संविधान जाळल्याने खरंच बाबासाहेबांचे विचार संपणार आहेत का ? असा प्रश्न देखील उपस्थित केला. दरम्यान रणमोचान येथील उच्च शिक्षित वैज्ञानिक अधिकारी सुरेश जी प्रधान यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला मंचावर राहुल शिवणकर रणमोचन, अंकुश चहांन्दे मालडोंगरी, अध्यक्षस्थानी नेपाळ टेंभुनें, सुरेश प्रधान, भाग्यवान शेंडे, सरपंच नीलिमा राऊत, उपसरपंच सदाशिव ठाकरे, माजी सरपंच भारत मेश्राम उपस्थित होते. संचालन सचिन मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बौध्द समाजाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व संपूर्ण युवा कार्यकर्ते आणि महिला भगिनींनी अथक परिश्रम घेतले. बुद्ध भीम गीतांचा संगीतमय सोहळा पाहण्याकरिता परिसरातील रसिकांची गर्दी उसळलेली होती.