सत्यवान रामटेके यांचे आमरण उपोषण, सामाजीक वनीकरणाचा वृक्षारोपणात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार.गडचिरोली- सामाजिक वनिकरण विभाग वडसा यांना महाराष्ट्र शासनाने 33 कोटी पैकी काही झाडे लावण्यास अनुदान दिले असता सदर कामात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला. सदर प्रकरणाची योग्य चौकशी करावी या मागणी साठी सामाजीक कार्यकर्ते सत्यवान रामटेके दि . २ मे पासुन तहसिल कार्यालय वडसा समोर आमरण उपोषणाला बसले आहेत. देसाईगंज सामाजीक वनीकरण विभागातर्फे 33 कोटी वृक्ष लागवड राज्य अर्तगत झालेल्या संपुर्ण कामावरील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी या मागणी साठी सत्यवान रामटेके हे उपोषणाला बसले आहे. सामाज्रीक वनीकरण विभागाने झाडे लावताना कुपण न लावणे , उन्हाळ्यात पाणी न टाकल्यामुळे झाडे सुकलीत ' बोगस मजुरांची हजेरी लावणे , सदर प्रकरणात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. सदर प्रकरणाची योग्य चौकशी करावी व दोषीवर कारवाई करावी अशी सत्यवान रामटेके यांची मागणी आहे. सदर त्यांचा रास्त मागणी साठी ' रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर ' कार्याधक्ष मुरलीधर भानारकर ' आम आदमी पार्टीचे . दिपक नागदेव , भरत दहिलानी ' आशिष घुटके ' प्रमोद दहिवले ' चंदु ठाकरे , शिल्पा मॅडम ' शेखर बारापात्रे ' सहीत बहुसंख्य कार्यकर्त्यांनी उपोषणाला पाठींबा दर्शविला होता.