बस-कारच्या धडकेत व्यापाऱ्यासह दोघे गंभीर


 नागभीड बस आणि कारमध्ये झालेल्या धडकेत कारमधील दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना नागभीड आरमोरी मार्गावरील भिकेश्वरजवळ बुधवारी (दि. २४) दुपारी ४.३० च्या दरम्यान घडली. गिरीश गिडवाणी आणि चालक कृणाल गंधे अशी कारमधील जखमींची नावे आहेत. येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर नागपूरला हलविण्यात आले. -
व्यावसायिक आहेत. कारने (क्र. एमएच ४९ बीबी ०८६९) कामानिमित्त गडचिरोली येथे आले होते. नागपूरला परत जात असताना नागभीडकडून ब्रह्मपुरीकडे जाणाऱ्या बसला (क्र. एमएच ४० एन ८९४९) कारने जोरदार धडक दिली. या धडकेत कारच्या समोरील भाग पूर्ण चेंदामेंदा झाला. बसचेही नुकसान झाले. गिरीश गिडवाणी आणि चालक कृणाल गंधे हे दोघे गंभीर जखमी झाल्याने नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल गिरीश गिडवाणी हे नागपूर येथील करून नागपूरला हलविण्यात आले.