आरमोरी येथील महात्मा गांधी महाविद्यालय जवळ नुकताच झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती प्राप्त झालेली आहे.
आरमोरी येथील संगमवर सर हे आपल्या बाजूने बर्डी वरून येत असताना मागेहून वेगाने येणाऱ्या अज्ञात इसमाने संगमवर सरांच्या दुचाकीला मागेहून धडक दिली .
त्या धडकेत अनोळखी इसम किरकोळ जखमी झाला. डोक्याला मार लागला आहे अशी माहिती मिळालेली आहे. त्याला तात्काळ आरमोरी येथील दवाखान्यामध्ये हलवण्यात आले आहे.