५ मे पासून मार्कंडा देव येथे महादेवाचे जागृती अनुष्ठान व जलाभिषेक कार्यक्रमाचे आयोजन



*आमदार डॉक्टर देवरावजी होळी*

*५ मे बुद्ध पौर्णिमेपासून १५ मे पर्यंत कार्तिक स्वामी धाम हरणघाट चे संत श्री मुरलीधर महाराज करणार जागृती अनुष्ठान*

*१५ मे ला जलाभिषेकाच्या धार्मिक विधी सह होणार समारोप*

*परिसरातील सर्व धर्माचार्य,भक्त भाविकांनी सहभागी व्हावे आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांचे आवाहन*

*दिनांक ४ मे २०२३ गडचिरोली*

*मार्कंडा देवस्थान मंदिराचे २०१५ पासूनचे थांबलेले काम पूर्ण व्हावे याकरिता मार्कंडा मंदिर देवस्थान कमिटी परिसरातील धर्माचार्य व भक्त भावीक यांनी ठरवल्यानुसार दिनांक ५ मे पासून १५ मे पर्यंत दिवस-रात्र मार्कंडादेव मुख्य मंदिराच्या परिसरात भगवान महादेवाचे अनुष्ठान करण्यात येणार असून दिनांक १५ मे रोजी जलाभिषेकाच्या धार्मिक विधीने या कार्यक्रमाचा समारोप होणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी याद्वारे दिली आहे.*


*विदर्भाची काशी असणाऱ्या मार्कंडा देवस्थानचे सन २०१५ पासून सुरू असलेले दुरुस्तीचे काम अजून पर्यंत पूर्ण झालेले नाही. त्याकरिता आपल्या हिंदू रितीरिवाज व पारंपारिक हिंदू संस्कृतीनुसार हिंदू देवी देवतांची धार्मिक विधी करण्याचे मार्कंडेश्वर देवस्थान समिती परिसरात तील मंदिरांचे धर्माचार्य व भक्त भाविक यांनी ठरवले आहे. त्याकरिता दिनांक ५ मे २०२३ बुद्ध पौर्णिमेपासून दिनांक १५ मे २०२३ पर्यंत श्री मुरलीधर महाराज कार्तिक स्वामी धाम हरणघाट यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिवस-रात्र भगवान महादेवाचे जागृती अनुष्ठान करण्यात येणार आहे. दिनांक १५ मे २०२३ रोजी जलाभिषेकाने या धार्मिक विधीचा समारोप करण्यात येणार आहे. करिता आपण या जलाभिषेकाच्या कार्यक्रमाला परिसरातील भक्त भाविकांनी मोठ्या संख्येने मित्रमंडळी सहपरिवार उपस्थित राहावे असे आवाहन आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी केले आहे.*