ट्रक-बोलेरोच्या धडकेत ११ ठाररायपूर, :  भरधाव ट्रकच्या धडकेत बोलेरोस्वार 5 महिलांसह 11 प्रवासी ठार झाले आहेत. ही घटना धमतरी जिल्ह्यातील रुद्री परिसरातील सोराम गावात बुधवारी रात्री घडली. हे सगळे नागरिक सोराम भाटगाव येथील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सोराम गावातील साहू कुटुंब कांकेर येथील चरमा मरकटोला येथे लग्नाच्या कार्यक्रमाला जात होते. बुधवारी रात्री बालोदच्या दिशेना जाताना समोरून येणाऱ्या ट्रकने बोलेरोला जबर धडक दिली. यात बोलेरोचा चक्काचूर झाला. बोलेरोमधील 5 महिला व एका चिमुकलीसह 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यावेळी या कुटुंबातील एक मुलगी गंभीर जखमी झाली होती. अपघातानंतर नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातातील मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत