डोजरखाली येऊन कामगाराचा मृत्यू

 
बल्लारपूर : वेकोलि अंतर्गत येणाऱ्या धोपटाळा खुल्या खदानीत ठेकेदारीमध्ये काम करणारा कामगाराचा डोजरखाली येऊन मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री १२:३० वाजता घडली. पोनगंटी नागराजू (४०) (रा. आंध्रप्रदेश) असे मृतक कामगाराचे नाव आहे. धोपटाळा खुल्या खदानीत खाजगी ठेकेदाराच्या वतीने कोळसा काढण्याचे काम सुरू आहे. मंगळवारी रात्री पोनगंटी नागराजू कामात मग्न असताना डोजर त्यांच्या अंगावर आल्याने घटनास्थळीचे मृत्यू झाला.