दोन अल्पवयीन मुलींवर १० जणांचा बलात्कारफेसबुकवर झाली होती ओळख...त्रिपुरा : येथील गोमती जिल्ह्यात दोन अल्पवयीन आदिवासी मुलींवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेतील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, अन्य नऊ आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोमती जिल्ह्यात बुधवारी ही घटना घडली. एका मुलीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या १० पैकी एक जण पीडितेला ओळखत होता. फेसबुकच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली होती. दोघांनी फोनवर बोलून जत्रेत भेटण्याचा बेत आखला. मुली जत्रेत आल्यावर आरोपीने दोन्ही अल्पवयीन मुलींना बळजबरी करून दुचाकीवर बसवत जंगलात नेले. तेथे आरोपीने इतर नऊ जणांसह मुलींवर सामूहिक अत्याचार केला. अत्याचारानंतर आरोपीने गुरुवारी
सकाळी पीडित मुलींना जत्रेत सोडले.

याबाबत पीडित मुलींनी बीरगंज पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पीडित मुलींचे १६ व १७ वर्षे आहे. पोलिसांनी आरोपी मेलाराय याला अटक केली आहे. त्याने गुन्ह्यात सामील असलेल्या इतरांची नावेही उघड केल्याने इतरांनाही लवकरच अटक केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.


३ दिवसांत २ सामूहिक अत्याचाराच्या घटना

गेल्या तीन दिवसात राज्यातील सामूहिक अत्याचाराची ही दुसरी मोठी घटना आहे. दोन दिवसांपूर्वी आगरतळा येथील महाविद्यालयात चार जणांनी एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला होता. ज्यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.