ग्रामपंचायत कार्यालय परसटोला येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा
अनेक वर्षे कामगारांचे शोषण झाले. त्यांच्यावर गुलामाप्रमाणे भांडवलदार वर्ग अन्याय करीत होता. पण डॉ. आंबेडकरांनी मजुरमंत्री असतांना कामगारांना सवलती, सोयी व अधिकार मिळवून दिले. त्यामुळे कामगारांचा उद्धार झाला असे प्रतिपादन ग्रामपंचायत सदस्य प्रितम रामटेके यांनी केले.
महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त ते बोलत होते. ध्वजारोहण सरपंच रामुजी कुंभरे यांनी केले. अध्यक्ष म्हणून कुंडलिक कोवे तंटामुक्त अध्यक्ष होते. त्याप्रसंगी ज्ञानेश्वर गेडाम उपसरपंच, वंदना मेश्राम ग्रा.पं सदस्य, छबिला शहारे ग्रा.पं सदस्य, कविता कुंभरे ग्रा.पं सदस्य, कैलाश आळे ग्रा.पं सदस्य, गिरीधारी रक्षा पो.पा., बिसेन साहेब ग्रामसेवक, आदी उपस्थित होते. संचालन सुरज रामटेके शिपाई यांनी केले. प्रास्ताविक नितीन मेश्राम केंद्रचालक यांनी मांडले. आभार धनराज नेवारे शिपाई यांनी मानले. याप्रसंगी गडचिरोली जिल्ह्यातील भु-सुरुंग स्फोटातील शाहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली..